Weight Loss Diet Plan
अंगात आलेला भदाडेपणा आणि पोटावर चढून खाली वरती हलत लटकणारी चरबी यामुळे भारतातील कित्येक लोकं त्रासलेले आहेत. नियमित व्यायाम करून पण जर भद झालेले शरीर कसदार होत नसेल तर खालील आहाराचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करावा.
Breakfast म्हणजे न्याहारी:
1.ज्वारी/ बाजरी/ नाचणीची इडली.
2.ज्वारीचा/ राळ्याचा उपमा.
3.बाजरी, राळे, कोदऱ्याचा मसाला उपमा. गाजर, द्विदल धान्ये, मटार यात घालता येऊ शकतात.
4.उकडलेले अंडे किंवा आम्लेट.
5.केळे, सफरचंद, संत्र, पपई.
6.हंगामी फळे आणि सुका मेवा, जसे नट्स, बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अळशी यांचाही अँटिऑक्सिडंट म्हणून उपयोग करता येऊ शकतो. या फळांसोबत खाव्या.
Lunch म्हणजे दुपारचे जेवण:
1.प्रथिने असलेल्या आमट्या, पालेभाज्या आणि हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ.
2.अंडी, पनीर, छोले, राजमा, मटार यातून प्रथिने मिळू शकतात.
3.वाटीभर भाज्यांचे सलाड, वाटीभर भात, भाज्या, आमटी, पालेभाज्या, दही जेवण म्हणून चालू शकेल
4.ज्वारी, बाजरी, राळं, नाचणी, बर्टीचाही समावेश केला जाऊ शकतो.
5.द्विदल धान्ये, फ्लॉवर, कोबी या भाज्या आहारात असल्याच पाहिजेत.
6.ताटातील पाव भाग अंडी (शक्यतोवर गावरानी) इत्यादींनी भरलेला असावा.
Evening Snacks म्हणजे संध्याकाळचे खाद्य :
1.संध्याकाळी उकडलेले हरभरे, स्वीट कॉर्न, हिरवे मुग, मखाणे, सोया चंक्स खाता येऊ शकतात.
Dinner म्हणजे रात्रीचे जेवण:
1.Garlic Vegitable Soup.
2.Moong Daal & Palak Soup Without Using Oil.
रात्री सूप आणि सहज पचणारे पदार्थ खावे.
Note :
तेल, तूप, साय असलेले दूध, खोबरेल तेल, पाम तेल यांचे आहारातील प्रमाण कमी करावे. ऑलिव्ह तेल, शेंगदाण्याचे तेल, तीळाच्या बियांचे तेल, मोहरीचे तेल, राइस ब्रॅन तेल यांचा वापर करावा.
गोड पदार्थ, अंड्याचा पांढरा भाग, किमी स्निग्धांश असलेले दूध, चीज, ताक आहारात समाविष्ट असावे.
पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राइस किंवा राळं खाणे चांगले असते.
फक्त प्रथिने असलेला आहार केला आणि चपाती/भात पूर्ण वर्ज्य केला तर मधुमेहावर औषधे न घेता नियंत्रण मिळवता येऊ शकते.
ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादींचा रोजच्या आहारात समावेश केल्याचे काही फायदे आहेत. या पदार्थांमध्येही कर्बोदके असतात हे बरोबर आहे. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स पचायला वेळ लागतो. म्हणून ते लगेच ग्लुकोजमध्ये रुपांतरित होत नाहीत. म्हणून रक्तातील शर्करेची पातळी वाढत नाही.
Comments
Post a Comment