डोळ्यांसाठी गुलाब जलचे फायदे !
डोळ्यांसाठी गुलाब जलचे फायदे !
गुलाब जल फक्त त्वचेची निगा राखण्यासाठीच नव्हे तर डोळ्यांची निगा राखण्यासाठी सुद्धा केला जातो. बाजारपेठेत उपलब्ध असलेले अनेक सौंदर्य प्रसाधने गुलाब जलचा वापर गुणवत्ता उंचावण्यासाठी करतात. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात उन्हापासून डोळ्यांचा बचाव करण्यासाठी व डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी गुलाब जलचा वापर कसा करू शकणार.
● आजकाल दैनंदिन जीवनात डोळ्यांचा वापर सर्वच करतात. तुम्हीही हा अंक वाचत असतांना स्मार्टफोन वर आपल्या डोळ्याची ऊर्जा घालवत आहात तर कुणी संगणकावर काम करत असतात, त्यामुळे डोळ्यातील नसा ताणल्या जातात.
● डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी गुलाब जलमध्ये कापूस भिजवून १५-२० मिनिटे बंद डोळ्यांवर ठेवल्याने डोळे शांत होतात.
● डोळ्यांमध्ये जळण होत असल्यास २-४ थेंब डोळ्यांमध्ये टाका व थोड्या कालावधीसाठी डोळे मिटून ठेवा ज्यामुळे डोळ्यातील धूळ अथवा माती निघून जाईल.
● डोळ्यांच्या आजूबाजूला गुलाब जल लावल्याने काळे घेरे नाहीसे होऊन डोळ्यांना आराम मिळतो.
● डोळे जर दुखत नसतील तर डोक्यालाही ताण येत नाही ज्यामुळे आपण दैनंदिन जीवनात स्फूर्तीने जगू शकतो.
● गुलाब जलमध्ये असलेले फ्लोवोनॉईड तुमच्या डोळ्यांमधून मस्तिष्कला शांत ठेवण्यास मदत करते म्हणून गुलाब जलचा वापर उन्हाळ्यात जास्त लोकं करीत असतात.
Comments
Post a Comment